आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना (कोव्हिड – १९) या विषाणुचा संसर्ग वेगाने फैलावत असल्या कारणाने तो पसरू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून श्री जीवदानी देवी संस्थानाने देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता भाविकांसाठी प्रथम सॅनिटायझरने हात स्वच्छ करूनच मंदिरात प्रवेश दिला जात होता. तसेच भाविकांना, लहान मुलांना व वयोवृध्दांना मास्क चे वाटप करण्यात आली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ठराविक अंतरावर ठेवूनच दर्शन दिले जात होते.
तसेच श्री जीवदानी देवी संस्थानाने कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये. म्हणून मंदिराच्या सर्व परिसरात तसेच आजूबाजूच्या परिसरात सोडिअम हायपोक्लोराइड या केमिकलने औषध फवारणी करत आहोत.
जनजागृती म्हणून मंदिर परिसरात कोरोना विषाणूपासून खबरदारी कशी घ्यावी ह्या बद्दलची माहिती अनाऊंसमेंट करून सांगण्यात येत होती. श्री जीवदानी देवी संस्थानतर्फे खेड्यापाड्यात आरोग्यसेवा देणाऱ्या रूग्णवाहिकेद्वारे सुध्दा दररोज मोफत औषधोपचार केले जात आहेत. व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रूग्णांना खबरदारीचे उपाय सांगितले जात आहेत.
परंतु दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात व देशात वाढतच राहिल्या कारणाने संसर्ग झालेल्या व मृत्यू पावत असलेल्या रूग्णांची संख्या वाढतच राहिली म्हणून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व माननीय मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे यांनी जनतेस केलेल्या आवाहनानुसार देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्याप्रमाणे सर्वप्रथम श्री जीवदानी देवी संस्थानाने भाविकांची देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी पालघर यांच्या आदेशानुसार मंदिर देवीच्या दर्शनासाठी भाविकांना बंद करण्यात आले. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर देवीच्या दर्शनासाठी बंद राहील असे सूचना फलक दर्शनासाठ येणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आले.
सामाजिक दायित्त्व लक्षात घेता भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची सुविधा मंदिर प्रशासनाने लगेच सुरू केली.
परंतू या संचारबंदी च्या काळात देशातील जनतेसाठी अहोरात्र झटणारे आपले डॉक्टर्स, नर्स, पोलीस यंत्रणा, कर्मचारी, सफाई कर्मचारी, अग्निशामक दल, आरोग्य विभाग कर्मचारी तसेच बेघरांना उपासमारीने जीवीतहानी होऊ नये म्हणून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निर्देशानुसार आपण त्वरीत दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था सुरू केली व त्याप्रमाणे वाटप सुध्दा आजपर्यंत करत आहोत. संचारबंदीच्या काळात गोरगरीब, सामान्य माणूस जेवणासाठी घराबाहेर पडू नये. तसेच ज्यांचे मीलमजूरी करून दररोजचे पोटापाण्याचा प्रश्न सुटत होता त्यांच्यापुढे या संचारबंदी काळात एक वेळच्या जेवणाचा प्रश्न सुध्दा गंभीर होत गेला.
“या लॉकडाऊन च्या काळात वसई विरार नालासोपारा परिसरात एकही नागरिक उपाशी राहू देणार नाही” अशी घोषणा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते आमदार श्री. हितेंद्रजी ठाकूर यांनी केली.
याच पार्श्वभूमीवर वसई विरार नालासोपारा शहरातील ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, मित्र परिवार आणि इच्छुक दात्यांना संपर्क करून श्री जीवदानी देवी संस्थान, श्री साईधाम मंदिर ट्रस्ट व इतर ट्रस्टच्या विश्वस्तांशी चर्चा करून विभागातील गोरगरीबांना अन्नपुरवठा करण्याची योजना आखली. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेप्रमाणे बेघरांसाठी सुध्दा दोन वेळच्या जेवणाची सुविधा करण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत व आजूबाजूच्या ग्रामीण भागात सुध्दा स्थानिक लोकप्रतिनिधींद्वारे गरीब लोकांची माहिती घेऊन त्यांना सुध्दा दररोज दोन वेळच्या जेवणाची सुविधा करण्यात आली आहे.
दररोज ४५०० ते ५००० गरजूचे जेवण हे दिवसभरात श्री जीवदानी देवी संस्थान तर्फे पुरविण्यात येत आहे. त्यासाठी प्रशासनाने दिलेल्या योग्य त्या सूचनांचे पालन सुध्दा करण्यात येत आहे.
तसेच वसई विरार शहर महानगर पालिकेने केलेल्या मागणीप्रमाणे त्यांना श्री जीवदानी देवी संस्थानच्या ताब्यात असलेले रूग्णालय दि. २६-०३-२०२० रोजी “श्री राजेंद्रकुमार अग्रवाल हॉस्पीटल” हे रूग्णालय महानगर पालिकेकडे हस्तांतरीत झाले आहे.
महानगरपालिकेस आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करणे व अद्यावत करणे आवश्यक आहे. तसेच महानगरपालिका हद्दीत निदर्शनास आलेले प्रवासी व संशयित रूग्ण यांना दाखल करण्याकरीता व उपचाराकरीता तातडीने अलगीकरण व विलगीकरण कक्ष सुविधा पुरेशा प्रमाणात निर्माण करणे आवश्यक होते. म्हणून सदरची आपात्कालीन परिस्थिती लक्षात घेता सदर रूग्णालय हस्तांतरणाबाबत ‘श्री जीवदानी देवी मंदिर संस्थान’, विरार यांनी सहकार्य केल्यामुळे ‘श्री राजेंद्रकुमार अग्रवाल हॉस्पीटल’ अग्रवाल उद्योग नगर, गोलानी नाका, वालीव, वसई(पू) हे रूग्णालय महानगरपालिकेस कोणतीही अट व शर्ती लागू न करता ताब्यात दिले आहे. तसेच श्री जीवदानी देवी मंदिर संस्थान, विरारकडे असलेल्या तीन रूग्णवाहिका ह्या महानगरपालिकेच्या मागणीनुसार कोणतीही अट व शर्ती लागू न करता आपात्कालीन परिस्थितीत कोरोन्टाईन रूग्णांची ने-आण करण्यासाठी ड्रायव्हरसहित दिल्या आहेत.
श्री जीवदानी देवी संस्थान, विरार यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेस प्राथमिक आरोग्य विभागासाठी विना अटी व शर्ती लागू न करता जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये दररोज गरीब, गरजू लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. व आताच्या ह्या कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळात ह्या जागेचा व सुविधेचा चांगला फायदा होत आहे.
श्री जीवदानी देवी संस्थान ने शिर्डी येथे निघोज ह्या ठिकाणी ओम साईधाम मंदिर ट्रस्ट ह्यांच्या तर्फे बांधण्यात आलेल्या साई पालखी निवारा यासाठी आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. तेथे येणाऱ्या भाविकांसाठी, तसेच पदयात्री, साई पालखी परिवार यासाठी विनामूल्य कायमस्वरूपी शेड बांधलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सर्व जिल्ह्यातील सीमा बंद केल्यामुळे अडकलेल्या बेघरांना, पदयात्रींना त्याच वास्तूमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून प्रशासनाला सहकार्य केले आहे.
श्री जीवदानी देवी मंदिर संस्थान, साई धाम मंदिर ट्रस्ट विरार, व्हिवा चॅरिटेबल ट्रस्ट, इतर सामाजिक संस्था आणि इच्छुक दात्यांच्या वतीने आतापर्यंत 71 लाखाहून अधिक गरजूंना अन्नपुरवठा!