Facility

श्री जीवदानी ट्रस्टचे योगदान व संकल्प

  • image

विवा महाविद्यालय सगणक विभाग

न्यासाचे भूतपूर्व अध्यक्ष भास्करराव ठाकूर यांच्या हस्ते वरील संगणक विभागाचे उद्घाटन झाले असून त्या विभागा साठी झालेले संपूर्ण ६५००००० /- रुपयांचे योगदान ट्रस्टने दिले आहेत . हजारो विद्यार्थी त्याचा शैक्षणिक लाभ घेत आहेत .

शिर्डी संस्थान श्रीजीवदानी विश्रामधाम

शिर्डी संस्थानाच्या परिसरात १० हजार चौ . फुटाची जागा जीवदानी ट्रस्टने खरेदी करून तेथे श्रीजीवदानी विश्रामधाम इमारत बांधून पूर्ण केली आहे .

यासाठी रु . ५०,००,०००/- ट्रस्टने खर्च केले आहेत . वसई तालुक्यातील साईपालखी घेवून जाणाऱ्या भाविकांसाठी तेथे विनामूल्य निवासाची व्यवस्था केली जाते .

पूर्वप्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणसंकुल

शिक्षण संकुलाच्या महात्वाकांशी योजनेसाठी विरार (पू .) येथे १७३ गुंठे जागा विकत घेतली असून लवकर त्या जागेवर पूर्वप्राथमिक ते महाविद्यालय कार्यान्वीय केले जाणार आहे .

फिरते विनामूल्य रुग्णालय फिरते विनामूल्य रुग्णालय

श्री ओम साईधाम मंदिर , विरार संचालित व श्रीजीवदानी ट्रस्टच्या सहयोगाने कै. भास्कर (भाऊ ) वामन ठाकूर स्मृती फिरता दवाखाना व औषध पेढी अशा आद्ययावत रुग्णवाहिकेमध्ये फिरते रुग्णालय व त्यामधून विनामूल्य रुग्णसेवा ट्रस्टतर्फे सुरु झाली आहे. या रुग्णालया द्वारे चंदनसार , जीवदानी पायथा परिसर , काशिंद कोपर ,भातपाड़ा ,बरफपड़ा , रईपाडा , कुंभारपाड़ा , शिवणसाई ,उसगाव , नवसाईं , भताणे , तांदळीपाड़ा, तळ्याचापाड़ा ,कोशिंबे , खार्डि , वैतरणा , गणेशपुरी , गाढ़गे महाराज आश्रम व भिवंडी , या पूर्व भागातील आदिवासी पाड्यांवर आरोग्य सेवा पुरवली जाते डिसेंबर २००८ मध्ये या सेवेचा १८३६ रुग्णांनी लाभ घेतला. या योजने द्वारा सात रुग्णांवर डॉ सोलंकी यांनी महात्मे आय हॉस्पिटल मुलुंड येथे यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया केली रुग्णांसाठी डॉक्टर , परिचारिका , वॉर्डबॉय , ड्राइवर व औषध खर्च श्रीजीवदानी मंदिर ट्रस्ट तर्फे केला जातो.

संजीवनी रुग्णालय सहायता

विरार येथील संजीवनी रुग्णालयासाठी लेप्रोस्कोपिक सर्जरी मशीन खरेदी करण्यासाठी ट्रस्टने रु १०,००,००० देणगी दिली असून श्रीजीवदानी ट्रस्टच्या नावाने तो विभाग सुरु झाला आहे.

महालक्ष्मी हॉस्पिटल , अर्नाळा सहायता

ट्रस्टने वरील हॉस्पिटलच्या विस्तार कार्यासाठी व रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रु ६,००,००० /- ची देणगी दिली आहे.

लोकमान्य सेवा संघ सहायता

दिवंगत व्यक्तींच्या दहनक्रियेच्या सर्पणा ट्रस्ट वार्षिक ९०,०००/- अनुदान देते .

वैद्यकीय सहायता

प्रतिवर्षी सुमारे ३,००,००० /- रुपये गरजूंना वैद्यकीय मदत म्हणून दिले जातात .

बाह्यरुग्ण दवाखाना

ट्रस्टच्या सुवर्णमोहत्सवी सोहळ्याप्रसंगी श्रीजीवदानी पायथ्याशी दि . २३/०२/२००९ रोजी विनामुल्य बाह्यरुग्ण दवाखाना सुरु होत आहे .